नमस्कार माझे वाचक मित्रहो,
मी दिनेश जगन्नाथ सुर्वे, काही दिवसांपूर्वी मी गोवा मध्ये सायकलिंग साठी गेलो होतो, तेव्हा तिथे काय काय घडले व आम्ही काय काय घडवले ह्या सर्व गोष्टींचा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. साधारण पंधरा सोळा दिवसांची शिदोरी तुमच्या समोर मी उलगडून ठेवणार आहे. माझ्या बरोबर काही गंमती घडल्या, काही अपघाताने तर काही मुद्दामहून घडवल्या त्या जशा त्या तश्या तुमच्या समोर मी मांडणार आहे.
लिखाणात काही तृटी आढळ्यास क्षमा करावी कोणाच्याही भावना दुखावणे हा माझा उद्देश जराही नाही आणि कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ह्याची काळजी मी स्वतः घेईन, पण जरी कोणास काही आवडले नाही तर कळविण्यास संकोच करू नये ही नम्र विनंती !!!
आपला सर्वांचा मराठी मित्र,
दिनेश जगन्नाथ सुर्वे.